पिवळसर आकाश. ढगांची दाटी. मुक्त विहरणारे पक्षी. त्यांच्या विहरण्यातील ती मुक्तता, ते पूर्ण पसरलेले पंख, दिशांच, अंतराच, वेगाच बंधन नाही, अजिबात नाही. मनात आणल तर चंद्राला स्पर्श करून येतील असा जणूकाही आवेश. माझ्या मनात उठणारे तरंग. या क्षणाला मी, ते पक्षी आणि आम्हाला जणूकाही आनंद देण्यासाठीच हे सगळं घडवत असल्यासारखा निसर्गाचा आमच्याशी चालू असलेला हा संवाद. एकरूपता. हा निव्वळ भास का हेच सत्य? हा माझ्यातील त्या आनकलनीय अंशाचा साक्षात्कार का फक्त मेंदूचे खेळ? हे माझ्या मनातील रसरंग नक्कीच आत्ता या क्षणाला अनेकांच्या मनात उमटलेत, न ठरवता अगदी नकळत. पाऊस चालू झाला. जोरदार पाऊस. अशा वेळी एखाद्याने मल्हार छेडला तर तो स्वतः श्रोत्यांसकट या रसरंगात आकंठ बुडून निघत असेल. ही आत्म्याची तृप्ति. आपल्या अस्तित्वाच्या मुळापर्यंत जाऊन स्पर्श करणारी. बधिर झालेल्या जाणिवा जाग्या करणारी. सत्याच्या जवळ नेणारी. कोणत्याही अपेक्षेशिवाय, कोणत्याही इच्छेशिवाय, इच्छापूर्तीशीवाय कण अन कण शांत करून सोडणारी. यामध्ये कोणीही कोणालाही घातलेली कसलीही अट नाही.सगळ्यांना समान प्रमाणात मिळणारी आकंठ तृप्ति. रंध्रा रंध्रात कणा कणात चैतन्याचा झरा वाहायला लावणारी जाणीव. जीवंत असल्याची जाणीव ! भीमसेन जोशींचा रंगीला मोहम्मद शहा काय आणि मी काय, आकाशातला तो पक्षी काय आणि त्याच्यासारखाच मुक्त विहरणारा मेघ काय, आम्ही सगळेच या क्षणी मुक्त, जीवंत आणि शांत. एकरुपतेची जाणीव म्हणजे वेगळं काय असणार? मी जरी या क्षणी मुक्त आकाशात विहार करून बरसू लागलो तरी मला नवल नाही वाटणार. करू लागलो तर काय? तेच करतोय मी ! हा क्षण खरच अव्यक्त !
अव्यक्त व्यक्त
Posted on by eklachalo
Published by eklachalo
I have few things in my mind....This is an effort to try n express those things properly n boldly through words....want to explore the power of expression ! View all posts by eklachalo
kharach avyakta….hi janiv ka ashich kaayam nahi rahat? ka nahi rahat? ka ?
haaaahhh…
ya mukti vishayi ravindranathanchi ek kavita ahe gitanjali madhe…nemke shabda nahit pan te mhantat..”Deliverance…where is this deliverance to be found…?our Masters has taken upon him the bonds of creation, he is always bound to us for ever…”
mag ti manasala kashi milnar…to fakta bhas asto…
praamanik pane sangayche zhalyas,he tujhe shabd samajnya itpat majhi bauddhik pragalbhta ankhi vikasit zhaali nahiye…parantu itke maatr nakki jaanavte ki…tanmay,tu maargavar aahes….chaalat raha…maajhya shubbhecha tujhya sobat..